Views: 542
मुख्यमंत्री यांच्या समर्थनार्थ सामन्य नागरिक यांनी लावला भला मोठा बॅनर
कल्याण : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष उभा राहिलाय. राज्यभरात एकीकडे शिंदे समर्थकानी शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावलेत तर दुसरीकडे शिवसैनिकांनी शिंदे विरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलंय. कल्याण-डोंबिवलीत मात्र शिवसैनिकांनी ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घेतल्याचे दिसून येते. त्यातच कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य नागरिक सरसावले असून नाना सावंत मंडळाने उद्धव ठाकरे यांच्य समर्थनार्थ बॅनर लावण्यात आला आहे.
ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून या पाठोपाठ कल्याण डोंबिवली शहराला देखील तितकेच महत्व आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी विरोध नाही, आंदोलन नाही, बॅनरबाजी न करता चूप बसण्याची भूमिका घेतली आहे आणि ती अजूनही तशीच असल्याची पाहायला मिळत आहे. मात्र अखेर शनिवारी संध्याकाळी कल्याणातील नाना सावंत मंडळाने उद्धव ठाकरे यांच्य समर्थनार्थ बॅनर लावलाय. कल्याण पश्चिम सहजानंद चौकात लावण्यात आलेला हा बॅनर चर्चेचा विषय ठरलाय. आम्ही शिवसैनिक नाही राजकारणी नाही, या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतो मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात चांगले निर्णय घेतलेत, सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे समानार्थ आम्ही बॅनर लावल्याचं या मंडळाचे म्हणणे आहे.
काय लिहलंय बॅनर वर
कल्याण मधील सहजानंद चौकात सर्वसामान्य नागरिक नाना सावंत मित्र मंडळ यांच्या तर्फे लावण्यात आलेल्या समर्थनार्थ बॅनरमध्ये ‘समर्थन आणि विरोध हा विचारांचा असावा व्यक्तीचा नव्हे, सत्यमेव जयते, आणि उद्धवजी ठाकरे साहेब समर्थक असे लिहिण्यात आले आहे.



