जीवनदीप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एचपीसीएल शिष्यवृत्तीचा लाभ

Views: 312
शेअर करा:
कल्याण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या जीवनदीप महाविद्यालय, गोवेली येथील गरीब, गरजू, होतकरू तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड  यांच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.
पैशाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहू नये, या उदात्त हेतूने एचपीसीएल  मार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भरीव आर्थिक सहाय्य मिळत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२–२३ मध्ये एकूण ४७८ विद्यार्थ्यांना सुमारे २६ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली होती. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये २४८ विद्यार्थ्यांना १८ लाख ९० हजार रुपयांची शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.
एचपीसीएल मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (आरोग्य विभाग) म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रफुल विशे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे व प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या कार्यक्रमास पंकज गिरी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मांडा–टिटवाळा), दिनेश कथोरे (युवा नेता, भाजप), प्राची पाटील (प्रसिद्ध मुरबाडी बाई), चिता शेट्टी (ॲक्शन डायरेक्टर), डॉ. आशा गुंजाळ (तालुका वैद्यकीय अधिकारी), सुरेश गायकर, डॉ. प्रतीक्षा घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य. डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य प्रा. हरेंद्र सोष्टे, ग्रंथपाल. प्रा. राजाराम कापडी,  पंकज मोरे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकवर्गाने एचपीसीएल आणि डॉ. प्रफुल विशे यांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी तब्बल ८०० विद्यार्थ्यांनी एचपीसीएल शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले असून, आगामी काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत