स्केटिंग खेळाडूंचा ९६ तास स्केटिंग चालवण्याचा विक्रम

Views: 560
शेअर करा:

कल्याण बेळगाव येथील शिवगंगा स्केटिंग क्लब येथे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पार पडलेल्या स्केटिंग विक्रमामध्ये ठाणे जिल्हा मधील मीरारोड येतील स्केटलाइफ क्लबच्या ३३ खेळाडूंनी ९६ तास स्केटिंग चालवण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

रोट्रॅक क्लब  बेळगाव येथे नुकताच हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी ९६ तासाचे लार्जेस्ट स्केट मोटो फार्मेशन स्केटिंगचा विक्रम करण्यात आला. या रेकॉर्डसाठी संपूर्ण भारतातून ४९६ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ३३ खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंचे ठाणे जिल्ह्यामध्ये कौतुक होत असून सर्व खेळाडूंना प्रशिक्षक संतोष मिश्रा, प्रफुल खरात आणि अमित मिश्रा यांचे मार्गदर्शन मिळाले. 

या विक्रमवीर खेळाडूंमध्ये अयान नेत्र, प्रद्युन रेड्डी, रितेश रेड्डी, जिया जियाल, अजिता जियाल, दिव्यांश जियाल, एम. विश्वकर्मा, अर्जित जोयाशी, अरमान सय्यद, आद्य बरनवाल, अर्जुन कामठ, आध्या कामठ, अर्णव थोरात, ऋषित तिवारी, स्वस्वत परीदा, अनिया भारती, देवांश खन्ना, अभिनव नवरी, अक्ष्य नवरी, दियान सैनी, तनिश गुच्छायत, अंश साळुंखे, अंश वर्मा, अन्विता बुटे, तेजस मोहंती, हर्षिता पाष्टे, हृदान जोशी, चाहत पायणे, प्रज्ञा पायने, वीर गजरा, मयांक चौधरी, जयेश चौधरी, सर्वेश कोचरेकर यांचा समावेश होता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत