महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अंकुर आहेर यांची सेवापुर्ती

Views: 413
शेअर करा:

कल्याण :  डोंबिवली येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराचे विजेते आणि विद्यार्थ्यांचे आई-वडील म्हणून कर्तव्य बजावणारे क्रीडा प्रशिक्षक अंकुर आहेर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन माजी विद्यार्थी आणि कल्याण तालुका क्रीडा शिक्षक मंडळाच्या वतीने सरस्वती मंदिर शाळेत आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अखिल भारतीय मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

  मान्यवरांनी सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कारमूर्ती अंकुर आहेर यांच्या  कर्तव्याबाबत,  आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, क्रीडा क्षेत्रातील समस्यांना शासनदरबारी रोखठोकपणे मांडणारे अविनाश ओंबासे, स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप कल्याण डोंबिवली विभातील सर्व क्रीडा शिक्षक, माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक, बंधुभगीनी आवर्जून उपस्थित होते. आरएसपी अधिकारी क्रीडा शिक्षक कमांडर मनिलाल शिंपी आणि दैनिक स्वराज्य तोरण चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने अंकुर आहेर यांना भावी आयुष्य निरोगी आणि समृद्धीचे जावो शुभेच्छा दिल्या. कल्याण डोंबिवली मधून लेझीम पथक दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी अंकुर आहेर यांनी व्यक्त केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत