मोबाईलमुळे माणसा माणसा मधील संवाद दुरावला – गुलाबराव पाटील

Views: 427
शेअर करा:

पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

कल्याण : मोबाईल पासून दूर राहा. मोबाईल ने आपले माणूसपण खिशात घातले आहे. माणसा – माणसा मधील संवाद दुरावत चालला. आपल्याला विज्ञानाच्या प्रात्यक्षिकातून, अनुभवातून आयुष्य घडवायचे आहे असे गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थांना संबोधित केले. पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागामार्फत गार्डन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज डोंबिवली येथे दोन दिवसीय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते.

आयोजित विज्ञान प्रदशनात तालुक्यातून प्राथमिक ४३ व माध्यमिक ३२ असे एकूण ७५ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकारी मीनाक्षी गागरे, गट शिक्षणाधिकारी रूपाली खोमणे, शिक्षण विस्तार अधिकारी विजया नाईकवाडी, दळवी मॅडम, गार्डन कॉलेजच्या मुख्याध्यापिका नायर मॅडम, मेनन मॅडम, परीक्षक माधव पाटील, वैशाली ठाकरे, अनिता घाडगे, नर्मदा दासरी तसेच पंचायत समितीचे रामभाऊ शिरोळे, विठ्ठल भोईर उपस्थित होते. 

जिल्हा परिषद शाळेतील बाल वैज्ञानिकाच्या भूमिकेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी हर्ष चव्हाण याने अध्यक्ष स्थान भूषविले व त्याच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. गुलाबराव पाटील आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना म्हणाले तुम्ही या देशाचे भावी शास्त्रज्ञ आहात. चिकित्सक आणि संशोधक राहिलात तर आपल्या कला गुणांना वाव मिळेल. मोबाईल पासून दूर राहा. मोबाईल ने आपले माणूस पण खिशात घातले आहे. माणसा – माणसा मधील संवाद दुरावत चालला. आपल्याला विज्ञानाच्या प्रात्यक्षिकातून, अनुभवातून आयुष्य घडवायचे आहे. 

हर्ष चव्हाण यांनी आपल्या देशात चांगले शास्त्रज्ञ निर्माण झाले तर देशाची प्रगती होईल असे सांगितले. मानपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी विजया नाईकवाडी यांनी केले तर आभार शर्मिला पष्टे यांनी मानले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत