Views: 849
कल्याण : शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा ठाकलाय. त्यातच ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने दावा केल्यानंतर ठाकरे यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केला असून याबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडळ यांनी कल्याण मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देत संगीतले. मशाल चिन्हावरून निर्माण झालेल्या या वादामुळे ठाकरे यांच्या समोरील आव्हान वाढलं असल्याचे दिसून येते आहे.
शिवसेना नावासह धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल उदय मंडल यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. शिवसेनेचा जो काही अंतर्गत वाद होता तो आता निकालात निघालाय. चिन्ह व पक्षाचे नाव हे शिंदे गटाला मिळाले त्यामुळे आमचं चिन्ह का अडकवून ठेवलय असा सवाल मंडळ यांनी उपस्थित केला. आमचं चिन्ह इतर कोणत्या पक्षाला देऊ नका आमचं चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
समता पार्टी ही बिहार मधील एक मोठी पार्टी आहे. २०२२ ला मशाल हे चिन्ह आम्हाला परत मिळाले. मशाल चिन्हावरून समता पार्टीची ओळख आहे. निवडणूक आयोगाकडून ही चूक कशी झाली. चिन्ह घेताना शिवसेना नेत्यांना याबाबत कल्पना नव्हती का ? त्यांनी जाणून-बुजून असं केलं का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना उदय मंडल यांनी आम्ही धनुष्यबाण व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांना जरी मिळाला असता तरी त्यांचे देखील अभिनंदन केलं असतं. आम्हाला शिवसेनेच्या अंतर्गत वादाशी काही देणंघेणं नाही, आम्हाला आमचं मशाल हे चिन्ह हवंय त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान काही जणांना मुख्यमंत्री पुढे करतात या आरोपाला उत्तर देताना उदय मंडल यांनी संजय राऊत यांच्या जवळ तर काही उरलं नाही खोके देखील नाही असा मिश्किल टोला लगावला. त्यांच्या कडून मुख्यमंत्र्यांचे खुर्ची एकनाथ शिंदे घेऊन गेले पार्टी घेऊन गेले, चिन्ह देखील घेऊन गेले तरी हे पाहत राहिले, यांच्याकडे काही उरल नाही तर दुसऱ्याकडे बोटं दाखवतात समता पार्टीकडे बोटं दाखवतात त्यांच्याकडे काहीच नाही असा टोला लगावला.



