Views: 616
कल्याण परिमंडळाच्या मेळाव्यात 27 कुटूंबीय सहभागी
डोंबिवली प्रतिनिधी (रोशनी खोत) : महावितरणच्या सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. अपूर्ण कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी कल्याण परिमंडळात आयोजित केलेल्या मेळाव्यात 27 कुटूंबियांनी सहभाग नोंदवत प्रक्रिया समजून घेतली व सहा जणांनी या मेळाव्यातच कागदपत्रांची पुर्तता केली.
महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक डॉ. नरेश गिते यांनी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना नोकरीत सामावून घेण्यासाठी आवश्यक कामांना गती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या उपस्थितीत अवलंबितांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रलंबित सर्वच ४० अवलंबितांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यातील २७ जणांनी मेळाव्यात सहभाग घेतला. मुख्य अभियंता औंढेकर आणि सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड यांनी उपस्थितांच्या अडचणी व शंकांचे या मेळाव्यातच निवारण केले. तर ६ अवलंबितांनी या मेळाव्यात अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केली. उर्वरित अवलंबितांनाही अपूर्ण कागदपत्र तसेच कायदेशिर वारस असल्याचे प्रमाणपत्र तातडीने जमा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
या मेळाव्यासाठी मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यस्थापक गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक निलेश भवर, व्यवस्थापक करण हुनूरकर, अंजली शिंदे, जयेंद्र भांड, उपव्यवस्थापक स्मिता राणे, मिनाक्षी व्यास, मनिषा वाघमारे, सुनिता वानखेडे, संजय वैकुंठे, नारायण ताकसाळे, अप्पासाहेब भोकरे, कैलास धारणे, प्रशांत साखरे आदींनी प्रयत्न केले.



