रिजेन्सी ग्रुप तर्फे आंतरशालेय भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

Views: 507
शेअर करा:

५० शाळांचा सहभाग तर प्रदर्शनाला २५ हजार विद्यार्थ्यांची भेट आंतरशालेय

कल्याण : विद्यार्थ्यां मधील कला गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना उभारी देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि कोविड पोस्टर् स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दोन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन रिजेन्सी ग्रुप तर्फे करण्यात आले असून या प्रदर्शनात आणि स्पर्धेत ५० शाळांनी सहभाग घेतला होता. तर या प्रदर्शनाला २५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भेट दिली असल्याची माहिती रिजेन्सी ग्रुपचे संतोष डावखर यांनी दिली

       रिजेन्सी ग्रुप तर्फे २०१४ पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे भरवले जाते. कोरोना काळाच्या दोन वर्षानंतर यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त अंतर शालेय विज्ञान प्रदर्शन आणि कोव्हीड पोस्टर स्पर्धेचे आयोजन ३० आणि ३१ जानेवारी या दोन दिवशी करण्यात आले होते. या स्पर्धेत कल्याण डोंबिवली परिसरातील तब्बल ५० शाळांनी सहभाग घेतला होता. प्रदर्शनात ग्लोबल वॉर्मिंग, कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिकचा उपयोग करून रस्ते बांधने, शहरी आणि ग्रामीण प्रदूषण, ओला कचऱ्याचे खातात रुपांतर इत्यादींसह अनेक विविध विषयांचे प्रकल्प मांडण्यात आले होते. तसेच हे प्रदर्शन बघण्यासाठी तब्बल २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना ने – आण करण्यासाठी रिजेन्सी ग्रुप तर्फे बसेसची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आम्ही विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले असल्याचे डावखर यांनी सांगितले.     

या प्रदर्शनात जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख, पारितोषिक, विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एकूण दीड लाखाचे पारितोषक देण्यात आले. त्याचबरोबर विशेष आकर्षण म्हणून मुलींचा रोप मल्लखांब तर मुलांचा पोल मल्लखांब याची प्रात्यक्षिके ठेवण्यात देखील आले होते. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत