वाडे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Views: 437
शेअर करा:

कल्याण : प्रबुद्ध विकास मंडळ यांच्या वतीने वाडे गावी सिद्धार्थ सेवा मंडळ वाडे ग्रामीण तसेच मिलिंद मंडळ ग्रामीण वाडे गावी लुंबिनी बुद्ध विहार येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बुद्ध विहाराच्या प्रांगणात मुंबई मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सिद्धार्थ सेवा मंडळ मुंबई यांचे माजी सरचिटणीस मोहन वाडेकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले.

बग्रामीण मंडळाचे पी के वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्याक्रमचे सूत्रसंचालन जयवंत वाडेकर आणि दिलीप वाडेकर यांनी केले. देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे साळुंके, सौंदाळेकर, इंगळे, मुटारकर, अशोक वाडेकर, विलास वाडेकर आदींनी जयंतीचे महत्व समजावून सांगितले. तरुण मित्र मंडळाचे संजय वाडेकर, सिद्धार्थ वाडेकर, संदीप वाडेकर, सुशांत वाडेकर, निखील वाडेकर, अमित वाडेकर, प्रणाम वाडेकर, संतोष वाडेकर यांचे कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य मिळाले. यावेळी वाडे गावच्या माजी सरपंच शीतल वाडेकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा मानली वाडेकर आदी उपस्थित होत्या.

Happy
Happy
75 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
25 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत