२७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

Views: 439
शेअर करा:

कल्याण : दिनांक २७ फेब्रुवारी रोजी महापालिका क्षेत्रात सर्वत्र पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ० ते ५ वर्षे वयाखालील सुमारे १,५९,०६२ बालकांना ५४० लसीकरण केंद्रामार्फत मोफत पोलिओची लस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच दि. २७ फेब्रुवारी रोजी जी बालके बुथवर पोलिओचा डोस घेण्यासाठी येऊ शकणार नाही त्यांना पुढील ५ दिवसात त्यांच्या घरोघरी जाऊन लस पाजण्यात येईल. त्यासाठी एकूण ७३५ लसीकरण चमू असतील” मागील वेळेस २६ सप्टेंबर २०२१ दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत १,७१,७३० बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली आहे.

तरी  हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रीय सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचा स्वानंद मिळवून संपुर्ण जगातून पोलिओचे उच्चाटन करण्यात सिंहाचा वाटा उचलून आपल्या बालकांचे संरक्षण करावे, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत