कल्याणमधील शाळांचा पालक म्हणून सदैव मदतीसाठी तयार – माजी आमदार नरेंद्र पवार

Views: 577
शेअर करा:

कल्याण : कल्याण पश्चिममधील श्री गजानन विद्यालय माध्यमिक शाळेत माजी आमदार नरेंद्र पवार यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. आमदार निधीतून संरक्षक भिंत व पाणपोईसाठी भरीव निधी दिल्यानिमित्त हा सत्कार करण्यात आला.

शैक्षणिक संस्था या समाज घडवण्यासाठी महत्वाच्या आहेत. समाजातील प्रत्येक चांगल्या घटकांची जबाबदारी ही शाळांची असते. या संस्था टिकाव्या, वाढीस लागाव्या आणि समृद्ध व्हाव्या ही माझी अपेक्षा असते. मी आमदार असताना तर शाळांसाठी निधी असो अथवा कोणते काम असो मनापासून केलेच, मात्र आमदार नसताना सुद्धा त्याच तत्परतेने मी कार्यरत आहे, या सज्जन आणि संस्कारित पिढी घडवत असलेल्या या संस्था आहेत, कल्याणमधील सर्व शाळांचा पालक मी सदैव मदतीसाठी तयार असल्याचे मत माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

नरेंद्र पवार यांनी आपल्या आमदार निधीतून श्री गजानन विद्यालयाच्या संरक्षक भिंत व पाणपोईसाठी निधी दिला होता, त्यानिमित्त हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ, कल्याण संस्थेच्या अध्यक्षा राष्ट्रपती पुस्कार विजेत्या प्रतिभा भालेराव, संस्थेचे संचालक केदार पोंक्षे, किशोर काळे, माध्यमिक विभागाच्या मुख्यध्यापिका कांचन भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्यध्यापिका माळी मॅडम,भटके विमुक्त आघाडी प्रदेश युवा सरचिटणीस अशोक शेळके आदी पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत