Views: 540
कल्याण : होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी मद्यपान करुन वाहन चालविणा:या २९ वाहन चालकांच्या विरोधात कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र क्षीरसागर यांनी कारवाई केली होती. या मद्यपी वाहन चालकांना कल्याण न्यायालयात हजर केले असते. न्यायदंडाधिकारी यांनी या मद्यपी वाहन चालकांना २ लाख ४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
३१ डिसेंबर आणि नव वर्ष स्वागताच्या पाश्र्वभूमीवरही क्षीरसागर यांनी ४१ मद्यपी वाहन चालकांच्या विरोधात कारवाई केली होती. न्यायदंडाधिका:यांनी या ४१ मद्यपी वाहन चालकांना ३ लाख ७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. १८ वर्षाखालील असलेल्या २७ अल्पवयीन वाहन चालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सहाय्यक पोलिस आयुक्त मंदार धर्माधिकारी यांनी त्यांच्या पालकांना बोलावून घेतले. पालकांच्या समोर या अल्पवयीन वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले.



