ग्रामीण भागातील महिलांना उद्योजिका बनविण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार

Views: 523
शेअर करा:

कल्याण : महिलांना उद्योजिका बनवण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे होत आहे. मंगळवारी १२ एप्रील रोजी शिवसेना  युवासेना ठाणे ग्रामिण यांच्या वतीने गणपती मंदिर हॉल येथे महिलांसाठी व्यवसाय उद्योजक मेळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख वसंत लोणे, माजी नगरसेवक सुनील वायले, ग्रामीण जिल्हा सचिव या ऍड. अल्पेश भोईर, ऍड. जयेश वाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामिण भागातील महिलांना हक्काचा उद्योग व्यवसाय सुरु करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी इच्छा असुनही उद्योग व्यवसाय काय करावा हेच माहित नसतं तर कधी उमेद असुनही भांडवलाची समस्या महिलांच्या कतृत्वाला मर्यादा आणते. याच प्रश्नांची उकल करत महिलांना व्यवसायाच्या संधी आणि साधनं उपलब्ध करुन देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे.

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगचे की “मराठी माणासाने काम मागणारे नाही तर काम देणारे बनले पाहिजे”. त्यांनी दाखवलेल्या याच मार्गाने चालण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याने ग्रामिण भागातल्या महिलांना उद्योजिका होता येईल या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना ठाणे ग्रामिण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.

या नियोजित मेळाव्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातुन विविध व्यवसाय देणाऱ्या जवळपास ६० संस्था तसेच वित्तसंस्था सहभागी होणार आहेत. राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास व्हायचा असेल तर महिला सबलीकरण व सक्षमिकरण आवश्यक असल्याने ठाणे ग्रामिण जिल्ह्यातील अधिकाधीक महिला बचत गटांनी आणि महिलांनी या उद्योजिका मेळाव्याला भेट द्यावी असं आवाहन प्रकाश पाटील यांनी केले असुन येणाऱ्या काळात जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातही असेच मेळावे आयोजित केले जाणार असल्याचही त्यांनी सांगीतलं. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत