Views: 527
कल्यान : कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शानख़ाली केडीएमसीचे भाजपाचे माजी नगरसेवक विश्वदिप पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत शालेय व कॉलेज विद्यार्थ्यांनच्या शिक्षणात हातभार लागवा यासाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रभागामध्ये गोर-गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आहेत. येथील मुलांच्या शिक्षणात आपलीही मदत व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यात आल्या. त्याचाबरोबर कॉलेज विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी इंटरनेट महत्वाचे आहे म्हणून ती सेवाही मोफत कॉलेज विद्यार्थ्यांसाठी दिली आहे, असे पवार म्हणाले. हा कार्यक्रम डोंबिवली पूर्व येथील विश्वदीप सुभाष पवार यांच्या कार्यालयात संपन्न झाला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे भाजपाचे माजी नगरसेवक विश्वदिप पवार यांनी सामाजिक बांधिलकी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रम प्रभागातील लोकांसाठी केले आहेत. पावसाळा सुरु होताच प्रतिवर्षाप्रमाणे मोफत छत्र्या वाटप करण्यात आल्या. यामध्ये पोस्टमन, सोसायट्यांचे पाणी सोडणारी माणसे, सोसायटीतील झाडूचे काम करणारी माणसे, धुणीभांडी करणाऱ्या महिला, पावसात रस्त्यावर उभे राहून हार विकणारे, चहा विकणारे, इस्त्रीचे कपडे घरोघरी जाऊन देणारे, दळण दळून देणारे पिठाच्या चक्कीतील माणसे, रस्त्यावर बसून पावसात भाजी विकणारे अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लोकांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी वॉर्ड अध्यक्ष माधुरी भिडे, महीला उपाध्यक्ष धरती गाडा, वंदना गोडबोले, संतोष मेस्त्री, गणेश पाटिल, अश्विनी गायकवाड, शोभा दिवे, अपर्णा सुरंजे, हेमलता संत, सायली सावंत, महेन्द्र देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.



