Views: 569
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीर
कल्याण : टिटवाळा मधील मांडा येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या आयोजित आरोग्या शिबिरात आम आदमी पार्टीच्या कल्याण जिल्हा अध्यक्ष साधना कमलेश पार्टे आणि उपाध्यक्ष राजेश शेलार यांनी सहभागी घेत शिबिरात उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सुद्धृध राहावे यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आम आदमी पार्टीच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांशी जन संवाद साधण्याचे कार्य सुरु आहे. या शिबिर दरम्यान येणाऱ्या नागरिकांसोबत आम आदमी पार्टीच्या कल्याण जिल्हा अध्यक्ष साधना कमलेश पार्टे यांनी परिसरातील नागरिकांसोबत संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. संस्थेच्या वतीने नम्रता ठाकरे यांच्यासह उपस्थित डॉक्टर्स आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी झाला.



