Views: 574
कल्याण : नवरात्रीचा ९ वा दिवस म्हणजेच नवमी या दिवसाचे औचित्य साधून कल्याणमध्ये अलका सावली प्रतिष्ठानच्या वतीने स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यात आला.
ज्या स्त्रिया समाजातील विविध क्षेत्रात काम करून आपलं घर परिवार खंबीरपणे चालवत आहेत, अशा स्त्रियांचा “अलका सावली प्रतिष्ठान” च्या वतिने साडी, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यामध्ये फळविक्रेती, महिला पोलीस, आरोग्य कर्मचारी, शिक्षिका, घर काम करणारी महिला, मच्छी विक्रेती, पेट्रोल पंपावरील महिला कर्मचारी, सफाई कर्मचारी, महिला वाहतूक पोलीस आदींचा समावेश होता.
यावेळी अलका सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष व भाजप कल्याण पश्चिम शहर उपाध्यक्ष सुधीर वायले, खजिनदार अजय पवार, यश महाजन, अभिषेक गुप्ता, रवी सिंग, विकास, नंदा आदी सदस्य यावेळी उपस्थित होते. तर अलका सावली प्रतिष्ठानने सर्व सामान्य महिलांची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याने या महिलांना देखील गहिवरून आले होते.



