मराठी संस्कृती अभिजात आहे – प्रा.चंद्रशेखर भारती

Views: 491
शेअर करा:

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने “एक कविता कुसुमाग्रजांची एक कविता तुमची” कार्यक्रमाचे आयोजन

कल्याण : मराठी भाषा जगवायची असेल तर रोजगाराशी तिचा संबंध जोडला गेला पाहिजे. मराठी भाषा दुबळी, लाचार नाही हे जेव्हा मराठी माणमाला कळेल तो दिवस अभिमानाचा असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मराठी राजव्यवहारकोश, आणि स्वा.सावरकर या दोघांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठीचे प्रयत्न आपण विसरता कामा नये. मराठी संस्कृती अभिजात आहे असे मत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने “एक कविता कुसुमाग्रजांची एक कविता तुमची” या कार्यक्रमात प्रमुख पाहणे माहित्यिक चंद्रशेखर भारती’ यांनी व्यक्त केले.

मनातल्या भावना पोहचविण्यासाठी कविता हे एक उत्तम माध्यम आहे. मी कुसुमाग्रजांचे साहित्य बाचन मोठा झालो त्यांचे नटसम्राट हे नाटक तर आयुष्याचा नवा आयाम देणारे आहे असे प्रमुख पाहुणे रंगकर्मी सुधीर चिने यांनी प्रतिपादन केले. तसेच नवकवींना प्रोत्साहित केले. कार्यक्रमात ४० कवींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमिता कुकडे व सौ.परिघा विधाते यांनी केले. वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर, चिटणीस आशा जोशी, कार्यकारिणी सदस्या सीमा गोखले, निलिमा नरेगलकर, अरविंद शिंपी तसेच ग्रंथसेविका उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत