Views: 377
कल्याण : ६० वी महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धा २०२१ – २२ कल्याण प्राथमिक फेरीत गंधर्व गुरुकुल प्रतिष्ठान, टिटवाळा नाट्य निर्मित स्टार या नाटकास द्वितीय क्रमांकाचे, प्रकाश योजनेसाठी श्याम चव्हाण याना प्रथम, दिग्दर्शनासाठी राकेश जाधवना द्वितीय तर नेपथ्यासाठी समिर तोंडवळकर यांना द्वितीय असे सर्वांना जेष्ठ नाटकाराच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेश देण्यात आले. तसेच अभिनयासाठी अक्षता टाले व तुषार ढेपे यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मिळाले.
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक संचालनालय मुंबई आयोजित ५९ वा व ६० वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव विभागीय पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी रवींद्र नाट्य मंदिर येथे मान्यवर, जेष्ठ नाटककार, नाट्यकलाकार, नाट्यरसिक व बाल कलाकार यांच्या उपस्थितीत हर्ष उल्हासात पार पडला. हौशी मराठी व बालनाट्य स्पर्धा प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेत्या कलाकाराचा नाट्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीकडून प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आले.
गंधर्व गुरुकुल प्रतिष्ठान, टिटवाळा निर्मित स्टार या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन राकेश जाधव, नेपथ्य समीर तोंडवळकर, संगीत रोहण पटेल, प्रकाश योजना श्याम चव्हाण, वेशभूषा ऐश्वर्या बटवाल, रंगभूषा तस्वी घाडी, तिथी घाडी यांनी केले आहे. तर अनिल आव्हाड, अक्षता टाले, रोहित वायकर, तुषार ढेपे, सुरज नेवरेकर, आर्यन नांदगावकर, आर्णव नांदगावकर, विल्सन खराडे यांनी भूमिका साकारल्या आहेत.



