१००% निकालाची सम्राट अशोक विद्यालयाची परंपरा कायम

Views: 397
शेअर करा:

कल्याण :  पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालयाने सलग पंधराव्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम टिकवून ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते.

अभ्यासात अप्रगत विद्यार्थ्यांना अधिक वेळ देत विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला जातो. तोंडी परीक्षेचे गुण शाळेकडून एसएससी बोर्डला पाठविले जातात. पास होण्यासाठी लेखी परीक्षेत कमी गुणांची आवश्यकता असते म्हणून पास होणे आता सोपे झाले आहे असे गुलाबराव पाटील म्हणाले. यावर्षीही मुलींनीच गुणवत्तेत बाजी मारली असून शाळेतून मनीषा राठोड 84.80% प्रथम, स्नेहा थोरात 84.40%, द्वितीय व चैताली धिंदळे 84.20% गुण मिळवून तृतीय  क्रमांक मिळवत यश प्राप्त केले.

संस्था अध्यक्ष पी.टी. धनविजय आणि शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सहशिक्षक गणेश पाटील, ओमप्रकाश धनविजय, संगीता महाजन, संध्या पाटील, माधुरी काळे, उर्मिला साबळे व शोभा देशमुख यांचे विशेष कौतुक करत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत