Views: 424
कल्याण : सध्याच्या युगात बच्चे कंपनी मोबाईल मध्ये गुंतलेली असताना कल्याण मध्ये ओंकार चव्हाण याच्या शिवस्व ग्रुपने यंदाच्या दिवाळीत “किल्ले संग्रामदुर्ग” याची प्रतिकृती बनवली आहे. त्यांनी बनवलेल्या किल्ला पहाण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय साळवी यांनी त्याठिकाणी भेट देत त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली आहे.
या मुलांनी किल्ला तर सुंदर बनवलाय परंतु त्या किल्ल्याबाबतची सर्व माहीती व त्यासंबंधीचा इतिहास याचा प्रचंड अभ्यास केला आहे. तेथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला ते त्या किल्ल्यासाठी सर्व माहीती अतिशय सुंदर प्रकारे सांगतात. फिरंगोजी नरसाळा व चाकणचा किल्ला यांचे नावच अनेकांना माहिती नाही त्याबाबत देखील प्रचंड माहीती या ठिकाणी हि मुले देत आहेत. ओंकार चव्हाण व त्याच्या शिवस्व ग्रुपने साकारलेल्या किल्ल्याचा सुंदर फोटो व पाच हजार रूपयांचा धनादेश, शाल, पुष्पगुच्छ देऊन विजय साळवी यांनी त्यांचे शिवसेने तर्फे कौतुक केले.



