Views: 419
वाहनतळ असून अडचण नसून खोळंबा, रस्त्यावर गाडी उभी केल्याने नागरिकांवर होतेय कारवाई…
निलम चौधरी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने पालिका क्षेत्रात वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर वाहनतळे बांधली. मात्र काही वहानतळे स्टेशन परीसारपासून लांब असल्याने त्यांचा नगरिकान उपयोग होत नाही. ती वाहनतळे ओस पडली आहेत तर काही इतर कामांसाठी वापरली जातात. त्यामुळे नागरिक रस्त्याच्या दुतर्फा वाकड्या तिकड्या गाड्या लावल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे वाहतूक पोलीसान कडून या गाड्यांवर कारवाई केली जाते. अशा परिस्थितीत वाहनतळ असून अडचण नसून खोळंबा असा प्रकार पाहायला मिळत आहे.
कल्याण डोंबविली शहरातून मोठ्याप्रमाणात नागरिक मुंबई अथवा इतर भागात कामसाठी जात असतात. रेल्वे स्टेशन जवळ जर पर्यायी वाहनताळ उपलब्ध नसेल तर त्याचा नागरिकांना काही उपयोग नाही. त्याचबरोबर स्टेशन परिसरात न्यायालय आणि तहसील कार्यालय आहे. त्यामुळे गाड्या बजारपेठे अथवा शासकीय कार्यालय जात असताना वाहनताळची सोय उपलब्ध नसल्याने नगरिकान नाईलजास्तव रस्त्यावर गाडी उभी करावी लागते. त्यानंतर तिथे नो पार्किंगमध्ये गाडी उभे असल्याने ती गाडी ट्राफिक कडून कारवाई करता उचलली जाते. त्यामुळे नागरिकाना काम करत गाडीवर लक्ष ठेवून तारेवरची कसरत करावी लागते. वाहनतळ आवश्यक ठिकाणी नसल्याने नागरी वस्तीत बांधून त्याचा उपयोग काय?
कल्याण डोंबिवली महानगरपालिका परीक्षेत्रात ९ ठिकाणी वाहनताळासाठी आरक्षित भूखंडावर वाहनतळ उभारले खरे मात्र त्यातील काही वाहनतळ वापरविना पडून आहे. कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील कपोते हे वाहनतळाची स्मार्ट सिटी अंतर्गत पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. तर बोरगावकर वाडीचे वाहनतळ वापरात आहे. सम्राट चौकातील वाहनतळाचा पार्किंगसाठी वापर होत नसल्याने ते इतर व्यवसायासाठी देण्यात आले आहे. कल्याण पूर्वेतील समांतर रस्त्यालागत असलेल्या मोहन सृष्टि इमारत मध्ये असलेले वाहनतळ २०११ पासून बांधून तयार असून ते धूळखात पडलेले आहे. २०१८ – २०१९ मध्ये त्याची निविदा काढण्यात आली होती मात्र प्रतिसाद मिळाला नाही. कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोडवरील विकास अपार्टमेंटमध्ये २००९ मध्ये बांधून वापरण्यास तयार होते. पार्किंगसाठी उपयोग होत नसल्याने ती जागा २०१४ रोजी बाजारपेठ पोलिस स्टेशनला तीन वर्षासाठी भाडे तत्त्वावर जप्त वाहने ठेवण्यासाठी देण्यात आली. चिकानघर येथील हॉलीक्रॉस शाळे जवळील वाहनतळ नुकतेच २०१९ रोजी बांधून तयार आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल येथे २०१३ रोजी तळमजला आणि ओपन पार्किंगसाठी वाहनतळ बांधण्यात आले. २०१५ पासून ते वाहनतळ घनकचरा व्यवस्थापन विभागास देण्यात आली असून या जागेत काचाऱ्याच्या घंटगडया उभ्या असतात. शहाड पश्चिमला असलेल्या वाहनतळ सध्या घनकचरा व्यवस्थापनाकडे होते, सध्या स्थित्तीची माहिती नाही.
डोंबिवली पूर्वेतील सुनील नगरमधील पाथर्ली चिमणी गल्लीतील वाहनतळाची वापरविना दुर्दश झाली आहे. येथील वाहनतळ टेंडर प्रोसेसिंगने चालवण्यासाठी देण्यात आले होते. एक महिन्यानंतर परवडत नसल्याने वाहनतळाचा काम सोडून दिले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली. गेल्या १ महिन्यापासून हे वाहनतळ वापराविना पडून असून येथील बेसमेंटमध्ये ४ फुट ड्रेनेजचे पाणी भरले आहे. मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरात यांनी पाहणी केली आस्था वाहनतळाची दुर्दश आढळून आली. वाहनतळ नागरिकांना वापरण्यात यावे अशी सूचना घरात यांनी अधिकार्यांना केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता महिन्याभरात वाहनतळाचे टेंडर काढण्यात येणारा असून २ महिन्यात नागरिकांच्या वापरण्यासाठी सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले.
एकंदर पालिकेने लाखोंचा खर्च करून बांधलेले काही वाहनातळ स्टेशन परिसरात अथवा बजारपेठे जवळ नसल्याने ते नागरी वस्तीत असल्याने त्याचा नगरिकाच्या उपयोगात नसल्याने वापराविना अशा वास्तु धुळखात पडले आहे. त्याचा उपयोग होत नसल्याने पालिका अशा आरक्षित भूखंडावर विनाकारण का खर्च करते असा प्रश्न नगरिकानी उपस्थित केला आहे.



