रेरा प्रकरणतील अटकेतील ५ जणाना दोन दिवसीय पोलिस कोठड़ी

Views: 361
शेअर करा:

क्ल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आणि रेरा प्राधिकरण फसवणूक प्रकरणी एसआयटीने शुक्रवारी पाच जणांना अटक केली होती. या पाचही जणांना एसआयटी पथकाने आज शनिवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या पाचही जणांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवून या खोटय़ा परवानगीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळविले होते. या प्रकरणी वास्तूविशारद संदीप पाटील यांनी महापालिकेकडे तक्रार केली. महापालिकेने या प्रकरणात तक्रार दिल्यावर पोलिसांनी ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास एसआयटीक करीत आहे. एसआयटीने खोटे कागदपत्रे करून करणाऱ्या पाच जणांच्या आधी मुसक्या आवळल्या आहेत.

यामध्ये प्रियंका रावराणे, प्रवीण ताम्हमकर, राहूल नवसागरे, जयदीप त्रिभूवन आणि कैलास गावडे यांचा समावेश होता. या पाचही जणांना आज कल्याण न्यायालयात हजर केले आहे. पुढील तपासाकरीता आरोपीना पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी एसआयटीकडून न्यायलयाकडे करण्यात आली होती. निर्णयाअन्ति न्यायालयाने पाचही जणांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत