स्टडी व्हेज बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जनजागृती

Views: 403
शेअर करा:

कल्याण :  स्टडी व्हेज बहुउद्देशीय संस्थेतर्फे सायबर सिक्युरिटी बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कल्याण पूर्वेतील लोक कल्याण पब्लिक स्कूल लोकाग्राम येथील विद्यार्थ्यांना सायबर जागरूकताचे सायबर अवेरनेस या विषयावर वाख्यान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विध्यार्थ्यांना सायबर विषयी विविध समस्यांची, मुद्द्यांची माहिती देण्यात आली. या वाख्यान कार्यक्रमास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम व स्टडी वेव्हज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमाकांत चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया वापरताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर मुलांसमोर अनेक उदाहरण सुद्धा ठेवली. उमाकांत चौधरी यांनी सामाजिक माध्यमांचे फायदे आणि तोटे याबाबत मार्गदर्शन केले. लोक कल्याण पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका लीना मॅडम तसेच शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी सुद्धा कार्यक्रमात सहभाग घेतला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत