Views: 524कल्याण : डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसारआज बाळासाहेबांची शिवसेनेने कल्याण पूर्व आणि पश्चिम मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी कल्याणात केली आहे.
यामध्ये कल्याण पूर्वमध्ये मल्लेश शेट्टी यांची उपजिल्हा प्रमुख पदी, निलेश शिंदे यांची विधानसभा प्रमुख कल्याण पूर्व, कल्याण पूर्व शहर प्रमुख पदी महेश गायकवाड, कल्याण पूर्व विधानसभा समन्वयक प्रशांत काळे, कल्याण पूर्व उप शहर प्रमुख पदी नवीन गवळी आणि विशाल पावशे यांची नियुक्ती केलिया आहे. तर कल्याण पश्चिम शहर प्रमुख पदी रवींद्र पाटील, महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे, महिला शहर संघटक नेत्रा उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



