Views: 413
कल्याण : कल्याण तालुक्यातील जीवनदीप महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळाच्या माध्यमातून काव्यरंग हा कवितांचा कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये साहित्यविषयी आवड निर्माण व्हावी व मराठी साहित्यातील समृद्ध परंपरेची ओळख व्हावी, या अनुषंगाने महाविद्यालयातील मराठी वाड्मय मंडळाद्वारा आणि टीम मुराद यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरंग हा कवितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
काव्यरंग हा प्रतिनिधिक कवितासंग्रह मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यातील निवडक कविता तसेच मराठी साहित्यातील संत तुकाराम यांच्या पासून ते अलीकडच्या वैभव जोशी या कवींच्या कविता, गझल, व स्वरचित कविता टीम मुराद मधील नवोदित कवी शैलेश पाटील, विकास ठाकरे आणि अक्षय भोईटे यांनी उत्कृष्टपणे सादर केल्या आणि विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी यांची उपस्थिती होती.
तर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे हे देखील उपस्थित होते. प्रसंगी संस्थेचे संचालक प्रशांत घोडविंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के बी कोरे, मराठी विभाग प्रमुख प्रा. हरेंद्र सोष्टे, प्रा.दौलतराव कांबळे, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि टीम बाराखडी मधील सदस्यांची विशेष उपस्थिती होती.



