Views: 588
कल्याण : जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथील सांस्कृतिक विभाग नेहमीच आपल्या कला गुणांनी अग्रेसर राहिला आहे. अगदी सातासमुद्रा पार याने आपला नावलौकिक मिळवला आहे. यंदा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नुकत्याच पार पडलेल्या १८ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठिय ‘इंद्रधनुष्य २०२२’ या युवक महोत्सवात जीवनदीप महाविद्यालयाचा एम. ए. इतिहासमध्ये शिक्षण घेत असणारा विद्यार्थी तुषार शिरसाट याने रौप्यपदक प्राप्त केले आहे.
तसेच त्याने युवक महोत्सवासाठी मुंबई विद्यापीठातर्फे संघनायक म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे. तुषार शिरसाटच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, संस्कृती विभाग प्रमुख डॉ. दौलत कांबळे, प्राध्यापक वर्ग, तसेच कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



