संत निरंकारी मिशनच्या नेत्रचिकित्सा शिबिरात ७८ नागरिक लाभान्वित

Views: 466
शेअर करा:

कल्याण : ‘जीवन तेव्हा महत्वपूर्ण बनते जेव्हा ते इतरांसाठी जगले जाते’ हे  निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे दिव्य वचन समोर ठेवून संत निरंकारी मिशनतर्फे म्युनिसिपल स्कूल, वरळी येथे रविवारी आयोजित नेत्र चिकित्सा शिबिरात ७८ नागरिक लाभान्वित झाले. या शिबिरामध्ये नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडच्या तज्ञ डॉक्टरांनी नेत्र चिकित्सा केली. पोदार हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या चिकित्सा कार्यात सहकार्य केले.

        नेत्र चिकित्सेतून ३१ रुग्णांना चष्मे लागल्याचे दिसून आल्याने त्यांना चष्म्यांचे नंबर काढून दिले गेले व त्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. १६ रूग्णांना मोतीबिंदु निष्पन्न झाल्याने त्यांना एनएबीच्या माध्यमातून के बी हाजी बच्चूअली हॉस्पिटल मध्ये त्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले.  इतर रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली. या शिबिराचा लाभ कित्येक पोलीस कर्मचाऱ्यांना देखील झाला. त्यांनी संत निरंकारी मिशनच्या कार्याची स्तुती करत मिशनला धन्यवाद दिले.

संत निरंकारी मंडळाच्या सामाजिक कार्य विभागाच्या प्रेमा ओबेरॉय यांनी या शिबिराच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका निभावली. संत निरंकारी मंडळाच्या स्थानिक शाखेचे प्रबंधक, सेवादल यूनिट तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनात आपले मोलाचे  योगदान दिले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत