Views: 528
कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयाचा अनोखा उपक्रम
कल्याण : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती तसेच बालदिनाचे औचित्य साधत कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालायात विद्यार्थ्यांनी भविष्यात दारू, सिगारेट, गुटखा सारख्या मादक पदार्थांचे सेवन करणार नाही. अशी शपथ घेत मादक पदार्थ जाळून त्यांचे हवन केले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती सर्वत्र बाल दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने सम्राट अशोक विद्यालयात जयंती साजरी केली. लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतात. या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. आपल्या गुणी स्वभावामुळे नेहरू चाचा लहान मुलांना आपलेसे वाटायचे. म्हणून १४ नोव्हेंबर त्यांच्या जन्मदिनी आदरांजली म्हणून बालदिन साजरा केला जातो. सम्राट अशोक विद्यालयात आपल्यातील असलेली दुष्प्रवृत्ती भविष्यात व्यसनाधीन होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून दारू, सिगारेट, गुटखा अशा मादक पदार्थांचे सेवन भविष्यात करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही अशी शपथ उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी घेतली. कार्यक्रमा प्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



