Views: 380
कल्याण : खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सिनेमातील डायलॉग मारत टीका केली होती. या टीकेला कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील सिनेमातील डायलॉग द्वारे प्रतीउत्तर दिले आहे. प्रियंका चतुर्वेदी या स्वतः काँग्रेसशी गद्दारी करत शिवसेनेत खासदारकीसाठी आलेल्या असल्याने जिनके घर शिशे के होते है, वह दुसरो के घर पे पत्थर नही मारते असे म्हणत प्रतिउत्तर दिले आहे.
प्रियंका चतुर्वेदी या एक महिला असल्याने त्यांच्यावर जास्त काही बोलणार नाही. पण हेच जर एका पुरुषाने वक्तव्य केलं असतं तर त्याला त्यापध्दतीचं उत्तर दिलं असतं. चतुर्वेदी या स्वतः किती ठिकाणी फिरल्या आहेत, त्यांनी स्वतःची पार्श्वभूमी तपासावी. मुख्यमंत्र्यांनी तर एकप्रकारे उठाव केला होता क्रांती केली होती. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्याला गद्दार म्हणतात मात्र इथे तर आम्ही मूळ शिवसेना पक्षातच आहोत. मग गद्दारी कुठली आली.
त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही, त्यामुळे लोकांची सहानुभूती आणि स्तुती मिळविण्यासाठी असे पिक्चरचे डायलॉग बोलत असतात. आम्ही विकासाबद्दल बोलतो. श्रीकांत शिंदेंनी, मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं आहे त्यावर ते मतं मागत असतात. त्यांच्याकडे अजेंडाच नसल्याने पिक्चरचे डायलॉग मारत असल्याची टीका आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर केली आहे.



