मानवतेच्या मसीहाला नमन करण्यासाठी निरंकारी भक्तांकडून समर्पण दिवसाचे आयोजन

Views: 399
शेअर करा:

कल्याण : हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ ‘समर्पण दिवस’ समारोहाचे मुख्य आयोजन सोमवार, दि. 13 मे रोजी सांय 5 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात करण्यात येणार आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने निरंकारी जगतातील  भाविक भक्तगण सहभागी होऊन बाबा हरदेवसिंहजी यांच्या प्रति आपली श्रद्धा सुमने अर्पण करतील. समर्पण दिवसाच्या निमित्ताने स्थानिक स्तरावर एकूण 40 ठिकाणी विशेष सत्संग समारोह आयोजित केला जाणार असून त्यामध्ये मुंबई व डोंबिवली परिसरातील समस्त निरंकारी भक्तगण सहभागी होणार आहेत.

बाबा हरदेवसिंहजी प्रेम व करूणेचे मूर्तिमंत रूप होते. त्यांनी साधी राहणी आणि आपल्या दिव्य हसतमुख मुद्रेने केवळ भक्तगणांनाच कृतार्थ केले असे नाही तर समस्त मानवजातीला कल्याणकारी मार्ग स्वीकारुन सार्थ व समाधानी जीवन जगण्याची कला शिकवली. याच कारणाने समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये ते सदैव आवडते बनून राहिले. एक पथ प्रदर्शक बनून बाबाजींनी प्रत्येक भक्ताला आधार दिला ज्यायोगे तो एक सहज सुंदर व सशक्त जीवन जगू शकेल. आध्यात्मिक जागरुकतेबरोबरच समाज कल्याण कार्यांमध्ये बाबाजींनी आपले सकारात्मक योगदान दिले त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिरे, महिला सशक्तिकरण, शिक्षण अशा अनेक परियोजनांचा समावेश आहे.

बाबा हरदेवसिंहजी यांनी सद्गुरु रूपात 36 वर्षे निरंकारी मिशनची धुरा सांभाळली.  त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच मिशन जगातील 60 देशांमध्ये पोहोचले. राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावर संत समागम, युवा संमेलने आणि समाज कल्याण सेवांचे आयोजन सातत्याने होत आहे. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत