केडीएमसी  क्षेत्रातील अनाधिकृत  होर्डिंग्सवर निष्कासनाची धडक कारवाई सुरू

Views: 399
शेअर करा:

कल्याण : घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदु राणी  जाखड़ यांनी महापालिका परिक्षेत्रातील सर्व अनाधिकृत होर्डिंग्सवर  निष्कासनाची कारवाई करणे बाबत निर्देश सर्व प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

 त्या अनुषंगाने काल दिवसभरात इ प्रभागाचे सहा. आयुक्त भरत पवार यांनी काटई नाका येथील १०*१५ च्या अनधिकृत होर्डिंगवर आणि गायकर चौक येथील १०*१०च्या अनाधिकृत होर्डिंग वर निष्कासनाची कारवाई केली. त्याचप्रमाणे ड प्रभागाचे सहा. आयुक्त धनंजय थोरात यांनी चक्की नाका येथील १०*१५ च्या अनाधिकृत होर्डिंग वर निष्कासनाची कारवाई केली तर आय प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबईकर यांनी मलंग रोड द्वारली येथील २०*३० च्या अनधिकृत होर्डिंग वर निष्कासनाची धडक कारवाई काल दिवसभरात केली.

 महापालिका क्षेत्रात उभारण्यात आलेल्या सर्व  अनाधिकृत होर्डिंग्सचे सर्वेक्षण 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून सर्वेक्षणादरम्यान आढळून येणाऱ्या सर्व अनाधिकृत होर्डिंग्सवर प्रभाग स्तरावरून निष्कासित करण्यात येणार आहेत.  महापालिकेमार्फत परवानगी दिलेल्या सर्व होर्डिंगधारकांची या अनुषंगाने बैठक घेण्यात आली असून सर्वांना होर्डिंग्स ची तात्काळ संरचनात्मक तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत सक्त निर्देश देण्यात आले आहेत. जे होर्डिंगधारक विहित मुदतीत अहवाल सादर करणार नाहीत अशा होर्डिंग्सवर तसेच अहवालाअंती धोकादायक ठरलेल्या सर्व होर्डिंगवर तात्काळ निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मालमत्ता विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी दिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत