Views: 428
कल्याण : कल्याण पूर्वेतील सर्वे नंबर 108.110 येथील सर्वे नंबरवर नाल्याच्या बाजूला काढून ठेवलेली भर नाल्याच्या बाजूला सुमारे सहा फूट एवढी माती या ठिकाणी टाकल्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात जास्त प्रमाणात पाणी जाऊन नागरिकांचा नुकसान होणार असून याबाबत सदर ठेकेदार व महापालिका अधिकारी जबाबदार असतील. ठेकेदार हा मनमानी कारभार करत असून अधिकाऱ्यांना जुमानत नाही तरी सदर ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे कल्याण डोंबिवली जिल्हा सरचिटणीस मनोज नायर यांनी केडीएमसी प्रशासनाकडे केली आहे.
याठिकाणी संबंधित ठेकेदार हा दुसऱ्या जागेत मातीचा भराव टाकत असून रॉयल्टी देखील भरली नाही. सरकारचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. महसुल खाते व महानगर पालिका आयुक्त ह्याची डोळे झाक का ? येथील नागरिक भयभित असून त्यांना पुराचा धोका आहे. ठेकेदाराने पोजेक्ट मध्ये सिंमेट मिक्सिंग प्लांट बसवला आहे. पदूषण मंडळ किंवा सबधित खात्याची याला परवानगी नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनोज नायर यांनी केली आहे.



