मानवीयतेच्या भावनेतून दहिसरमध्ये १८६ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

Views: 505
शेअर करा:

कल्याण सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवसेवेच्या शिकवणूकीचा अंगीकार करत रविवारी दहिसरमध्ये 186 निरंकारी भक्तांनी मानवीयतेच्या भावनेने मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, घरटन पाडा, दहिसर येथे आयोजित या शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने रक्त संकलन केले.

संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशात सातत्याने रक्तदान शिबिरांची मालिका चालविण्यात येत असून त्याद्वारे गर्मीच्या दिवसांत रक्ताची टंचाई दूर करण्यामध्ये फार मोठी मदत मिळत आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे भाईंदर विभागाचे सेक्टर संयोजक हिम्मतभाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अनेक प्रबंधकगण तसेच सेवादल अधिकारी उपस्थित होते.  पोलीस निरीक्षक राम पोटे आणि सामाजिक कार्यकर्ते रामा विश्वकर्मा यांनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली व मिशनच्या कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखी घनश्याम विश्वकर्मा यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत