अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त कल्याणमध्ये जनजागृती

Views: 641
शेअर करा:

कल्याण : १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन  सेवा सप्ताह आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातही महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात असलेल्या आधारवाडी अग्निशमन केंद्र, एमआयडीसी अग्निशमन केंद्र, ह प्रभाग अग्निशमन केंद्र, ड प्रभाग अग्निशमन केंद्र, टिटवाळा अग्निशमन केंद्राच्या परिसरात, विविध ठिकाणी अग्निशमन व आणिबाणी विभागामार्फत प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन करुन पॅम्पलेट व माहिती पुस्तिका यांचे वितरण करण्यात येत आहे. सोमवारी केडीएमसी मुख्यालयासमोर हि जनजागृती करण्यात आली. यावेळी महापालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, अतुल पाटील, अर्चना दिवे, वंदना गुळवे, सचिव संजय जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी आदीजण उपस्थित होते.

       महापालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी विभागामार्फत महापालिका परिसरातील शाळा, दवाखाने, खाजगी दवाखाने, गृहसंकुले, गर्दीचा परिसर, स्टेशन परिसर, मॉल येथे प्रात्याक्षिके दाखवून तसेच आग लागल्यावर करावयाच्या प्राथमिक उपाययोजनांबाबत त्याचप्रमाणे उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करुन जिवीत व वित्त हानी कशी वाचविता येईल याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली, त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत