Views: 585
कल्याण :पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धा नुकत्याच गुरुगोविंद ट्रायबल विद्यापीठ बंसवारा येथे पार पडल्या.या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने तृतीय क्रमांक पटकावत आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली होती. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा चरण सिंह विद्यापीठ मेरठ येथे होणार आहे.
एसएसटी महाविद्यालयातील जितेश म्हस्कर, आकाश तोगरे, संकेत जाधव यांनी पश्चिम विभागीय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या विजयात आपला मोलाचा हातभार लावला होता. त्यामध्ये तोच संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवडण्यात येत असतो, या स्पर्धेसाठी अनुभवी खेळाडू म्हणून एसएसटी महाविद्यालयातील खेळाडू जितेश म्हस्कर याची निवड कर्णधारपदी करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाचे क्रीड़ा संचालक डॉ. मोहन आमृले तसेच एसएसटी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी, आयक्युएसी कोओर्डीनेटर डॉ. खुशबू पुरस्वानी, उपप्राचार्य जीवन विचारे, दिपक गवादे, तुषार वाकसे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुल, पुष्कर पवार, महाविद्यालयाचे मार्गदर्शक नरेंद्र मेंगल आणि प्रताप शेलार आणि मुंबई विद्यापीठ मार्गदर्शक मनोज पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



