Views: 672
कल्याण : कल्याण पूर्वेतील यु टाईप रस्ता रुंदीकरणास नागरिकांचा विरोध नसून आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी यु टाईप रस्ता बाधितांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्ता 40 व 50 फुट इतका मंजूर असून गेले काही वर्षे, तो 80 फुट करण्याची मागणी होत आहे. पुन्हा एकदा पालिकेने सुचना काढून लोकांच्या हरकती मागविल्या आहेत. जवळपास 1800 ते 2000 घरे अणि दुकाने या मध्ये विस्थापित होतील. त्यामुळे रहिवासी भयभीत झाले आहेत. गुरुवारी त्यांनी हरकत नोंदविण्यासाठी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. यावेळी 350 हरकत नोंदविण्यात आल्या आहेत. पालिका सेतू कार्यालयात यामुळे गोंधळ उडाला होता. पालिकेने पोलीस बंदोबस्त मागविला होता.
या रुंदीकरणा बाबत माजी नगरसेवक व पुनर्वसन समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांना विचारले असता, ते म्हणाले “रस्ता रुंदीकरणास आमचा विरोध नाही परंतु, विकासासाठी रस्ता रुंद करणे हे आयुक्तांच्या अधिकार कक्षात येते. तसेच या रुंदीकरणात बाधित होणार्या लोकांचे पुनर्वसन करणे हे सुद्धा आयुक्तांचे अर्थात पालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांनी रुंदीकरण प्रस्ताव व पुनर्वसन धोरण त्यांनी एकत्रीत आणले पाहिजे!”
क्लस्टर योजना मंजूर आहे म्हणतात तर त्या अनुषंगाने पालिकेने कारवाई केल्यास 50 ते 100 वर्षापासुन राहणार्या लोकांचे पुनर्वसना आहे त्याच ठिकाणी होवू शकते फक्त इच्छा शक्ती हवी “एकंदर विस्थापित होवू शकतील अशा लोकांचा पुनर्वसन धोरणा शिवाय रस्ता रुंदीकरण प्रस्तावास विरोध असेल असे दिसते. येणार्या दिवसात रस्ता रुंदीकरण प्रस्तावामुळे कल्याण पूर्वेचे वातावरण तापणार आहे.



