Views: 436
कल्याण : रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर
कल्याण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो व आयुर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आधारवाडी जेल मध्ये मेगा मेडिकल कॅम्प भरवण्यातआले होते.
या आरोग्य शिबिरासाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी संपूर्ण औषधे मदत म्हणून दिली. या आरोग्य शिबीर मध्ये ५५० ते ६०० कैद्यांनी आपली तपासणी करून औषध घेतले. डॉ. सुदर्शन पाटील आणी त्यांच्या सहकाऱ्यांनी डोळे तपासणी मध्ये ४५० जणांची डोळे तपासणी केली व त्यांना औषध दिले.
डॉ. प्रशांत पावशे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ३० ते ३५ कैद्यांची ईसीजी तपासणी केली.
डायबिटीस, रक्तदाब, स्किन, मूळव्याध, पाठ दुःखी असे आजाराचे पेशंट खूप आढळले. मानसिक तज्ञ डॉ. भूषण पाटील यांनी २५ ते ३० मानसिक रुग्ण तपासले. हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी केमिस्ट असो.चे १० ते १२ पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
या कार्यक्रमा मध्ये रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कैलास जेठानी यांनी जेल सुप्रिटेंडट यांचे आभार मानले की त्यांनी आम्हाला इथे सेवा करण्याची संधी दिली. तसेच जेल चे सुप्रिटेंडट राजाराम भोसले यांनी आपल्या भाषणात सांगितले की इथले जे बंदी आहे त्यांना खरोखरच वैद्यकीय सुविधांची खूप गरज आहे. त्यामुळे रोटरीने आरोग्य शिबीर आयोजित केल्यामुळे त्यांनी रोटरीचे आभार मानले. रोटरी चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी माधव चिकोडी, डॉ. राजन माने, डॉ. धर्मेंद्र उपाध्याय, डॉ. विध्याधर गांगण, रोटरीचे संदीप चौधरी, चंद्रकांत देव, भूषण कोठावदे, रोटरीचे अध्यक्ष विजय भोसले, सेक्रेटरी सुनील डाळिंबे, खजिनदार मितेश कलंबे आदीजण उपस्थित होते.


