Views: 516
सम्राट अशोक विद्यालयात ढोल-ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत
कल्याण : एकीकडे मराठी शाळांचा टक्का घसरत चालला आहे असे म्हंटले जाते, मात्र कल्याणाच्या सम्राट अशोक शाळेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठी, सेमी माध्यमाच्या वर्गांना प्रवेश घेतल्याची शिक्षकांसाठी आनंदाची गोष्ट समोर आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाला खऱ्या अर्थाने १५ जून पासून सुरुवात झाली असून पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालयात ढोल-ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शिक्षकांनी रांगोळी काढून पताके फुगे लावून शाळेचे प्रवेशद्वार व वर्ग सजावट केलेली होती. विद्यार्थी आल्यावर गुलाब पुष्प देऊन शिक्षकांनी स्वागत केले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी दिवे प्रज्वलित करून केक कापून नवीन वर्षाचे स्वागत केले. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांबरोबर खेळायचे साहित्य मुलांच्या हाती देऊन आनंदायी शिक्षण दिले जाईल असा शाळेने संदेश दिला. शाळेचा पहिला दिवस असूनही ८५ टक्केपेक्षा अधिक उपस्थिती होती. शाळा नियमित सुरू झाल्यामुळे मुलांबरोबर पालकही आनंदी दिसत होते. असे शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शैक्षणिक वर्षाचे स्वागत करत असताना विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही आनंद घेतला.
इंग्रजी माधामांच्या शाळा वाढू लागल्याने गेली काही वर्षापासून मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तर नुकतेच आजपासून सुरु झाली असून इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील ५ विद्यार्थ्यांनी कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक शाळेत मराठी आणि सेमी इंग्रजीच्या माध्यमांमध्ये प्रवेश घेतला. याव्बाबत मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि, मागील २ वर्षाच्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करावा लागल. त्यामुळे त्यांच्या अभ्यासात फरक पडला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फी देखील जास्त आहे. तसेच मराठी शाळामध्ये देखील विद्यार्थी चांगले घडू शकतील हा विश्वास पालकांना असल्याने त्त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी, सेमी माध्यमामध्ये प्रवेश घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.



