Views: 585
कल्याण : कर्नाटकात काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले असून या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचंड जल्लोषात विजयाचे स्वागत करण्यात येत आहे. कल्याण शहरात देखील काँग्रेसच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वसामान्य जनतेने भाजपला दिक्षिणेत नाकारले असून काँग्रेस पक्षाचे राहूल गांधी हे आगमी लोकसभा निवडणूकी नंतर पंतप्रधान होतील ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष असेल असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे यांनी करीत अगामी काळात इतर राज्यात होणाऱ्या निवडणूकीत भाजपची हार होणार असून भाजप मुक्त देश होईल असा ही टोला याप्रसंगी लगावला.
कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कल्याण काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेल्या जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडत व पेढे भरवित साजरा केला. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आढाव, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष जपजित सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, प्रवीण साळवे, मुन्ना तिवारी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



