विद्यार्थांना नवउद्योजक होण्यासाठी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन

Views: 559
शेअर करा:

कल्याण :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कल्याण, जि.ठाणे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर मार्गदर्शन शिबिरात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी युवकांना स्वयंरोजगार या संदर्भात मार्गदर्शन केले.

कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नवीन – नवीन व्यवसायाच्या संधी युवक – युवती यांना शोधाव्या लागतात. स्किल डेवलपमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांचा लाभ आपण सर्व युवाशक्ती ने घेतला पाहिजे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबद्दल माहिती घेऊन त्यांच्या मार्फत आर्थिक मदत ही आपल्याला शासन योजनांच्या माध्यमातून मिळवून देते. स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया अश्या योजनांच्या माध्यमातून युवाशक्ती मधील कौशल्य विकास होण्यासाठी व तरुणांना रोजगार मिळावा. नवीन उद्योजक निर्माण व्हावे यासाठी असे मार्गदर्शन शिबिर घेणे खूप आवश्यक असतात असे पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉ. श्रीनिवास दातार, देवेंद्र ताम्हाणे, कांचन खरे, वृंदा दुर्वे प्राचार्य कल्याण आयटीआय व बिडकर. एम. एम. निमंत्रक प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कल्याण (प) आदी  मान्यवर उपस्थित होते. युवक – युवती देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत