Views: 616
उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, खान्देशातील नदीजोड प्रकल्पाबाबत शासन दरबारी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्रीरविंद्र चव्हाण
कल्याण : १ मे महाराष्ट्र व कामगार दिनी संध्याकाळी ग्लोबल खान्देश महोत्सवाचा सांगता समारंभ मान्यवर अतीथींच्या व दिग्गजांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालघर व सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी खान्देश साठी उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ स्थापनेची केलली मागणी आणि नदीजोड प्रकल्पाची आपण केलेली मागणी तर्कसंगत व न्यायसंगत असल्यामुळे शासन दरबारी प्रयत्न करीन. सर्व महाराष्ट्रातील शेतकरी व शेती जलसिंचन प्रकल्पासाठी निश्चितच पुरक व पोषक निर्णय घेवू असं सूतोवाच केलं.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नाशिक व नगरसह खान्देश हाच खरा उत्तर महाराष्ट्र आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच माझंही स्वप्न आहे. आपला ग्लोबल खान्देश महोत्सव उत्तरोत्तर अधिक अधिक उंची गाठो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी, जळगावचे आमदार राजू भोळे यांनी कल्याणात खान्देश भवन साठी मदत करेन असं आश्वासन दिले.
यावेळी हास्यजत्रा फेम सेलिब्रिटी खान्देशपुत्र तथा दिग्दर्शक सचिन गोस्वामी, खान्देशपुत्र तथा अभिनेता श्याम राजपूत, अभिनेता हेमंत पाटील, निमिश कुलकर्णी आणि सहयोगी टीमचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अत्यंत खुमासदार व दिलखेचक स्वरुपात मनोरंजनपर कार्यक्रम ही सादर केला. सचिन गोस्वामी यांना खान्देश भुषण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.
ग्लोबल ग्लोबल खान्देश महोत्सवात ७५ हून अधिक स्टॉल होते. चार दिवसांत किमान एक ते दीड लाख हून अधिक रसिक प्रेक्षकांनी महोत्सवाचा आनंद घेतला. महोत्सवात सुमारे ३ कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. शेतकरी, महिला व तरुणाईला नोकरी ऐवजी व्यवसाय, उद्योग व व्यापाराचं महत्व पटवून देणारा खुलं व्यासपीठ म्हणजे महोत्सव होय.


