कल्याणात भाजपच्या रेखा राजन चौधरी बिनविरोध

Views: 455
शेअर करा:

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पॅनल १८ अ साठी रेखा राजन चौधरी यांचा भाजप मधून एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. याबाबत अधिकृत घोषण बुधवारी होणार आहे. मतमोजणी आधीच भाजपने खाते उघडले आहे.

पॅनल १८ अ हा ओबीसी महिला आरक्षित असल्याने येथून भाजपच्या रेखा राजन चौधरी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या पॅनल १८ अ मधून इतर पक्षातून किवा अपक्ष एकही अर्ज दाखल झाला नसून चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र कागदपत्रांची पडताळणी बुधवारी होणार असून यानंतरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत