६ वर्षाची प्रतीक्षा संपली : महापौर, उपमहापौरांची निवड

Views: 311
शेअर करा:

महापौर पदी अॅड. हर्षली थावील – चौधरी, आणि उपमहापौर पदी राहुल दामले

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची आज निवड झाली असून ६ वर्षापासून असलेल्या प्रशासकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. महापौर पदासाठी अॅड. हर्षली चौधरी – थवील, आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांची निवड करण्यात आली आहे.

महापौर पदासाठी अॅड. हर्षली थावील – चौधरी, आणि उपमहापौर पदासाठी राहुल दामले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झालीच होती. मात्र आजच्या महासभेत पीठासीन अधिकारी आचल गोयल यांनी औपचारिक घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, सचिव किशोर शेळके आदी उपस्थित होते.

कोरोना काळात नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने राजकीय राजवट सुरु झाली होती. कोरोना तसेच विविध कारणांमुळे महानगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या होत्या. गेल्या महिन्यात निवडणुका संपुष्टात येऊन अखेर ६ वर्षानंतर प्रतीक्षा संपली आहे. आज महापौर, उपमहापौर पदाची निवड झाली आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत