Views: 477उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण अंतर्गत ४४६ अधिकृत रिक्षा स्टँड
कल्याण : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण अंतर्गत असलेल्या रिक्षा स्टँडची यादी जाहीर करण्यात आली असून अंतर्गत एकून ४४६ स्टँड असल्याचे उप प्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले. याबाबत रिक्षा चालक मालक असोसिएशन कल्याण यांनी अधिकृत रिक्षा स्टँडची यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार परिवहन विभागाकडून रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकार्यांना पत्र देण्यात आले आहे.
रिक्षा चालक मालक असोसिएशन, कल्याण यांनी कल्याण येथे नवीन रिक्षा स्टँड आणि अधिकृत रिक्षा स्टँड जाहीर करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली होती. या मागणीला अनुसरुन उप प्रादेशिक कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक, केडीएमसी अधिकारी, वाहतुक शाखा कल्याणचे अधिकारी तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत संयुक्तिक सर्वेक्षण करण्यात येवुन संबंधित स्टँडला मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी अटी शर्तीस अधिन राहुन मंजुरी देण्यात आली आहे.
यादीत जाहीर केलेल्या ठिकाणीच मीटर, शेअर-ए-ऑटोरिक्षा स्टँड उभारण्यात यावा, ऑटोरिक्षा स्टँडमुळे वाहतुकीस कोणताही अडथळा होता कामा नये, कोणतीही रिक्षा डबल पार्किंग होणार नाही तसेच नमुद रिक्षा स्टँडमुळे वाहतुक कोंडी होणार नाही, प्रस्तावित रिक्षा स्टँड संदर्भात भविष्यात अडचण निर्माण झाल्यास त्याला इतरत्र हलविण्याचे अधिकार संबंधित विभागास असतील, रिक्षा चालविणारे चालकांनी नियमानुसार बॅच, ओळखपत्र प्रदर्शित करावे व गणवेश परिधान करावा, मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने ठरवुन दिलेले भाडेदर आकारणीनुसार भाडे घेण्यात यावे आदी अटी शर्ती परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण अंतर्गत अधिकृत रिक्षा स्टॅडची यादी जाहीर केली असून परिवहन अतर्गत एकूण ४४६ अधिकृत स्टँड असून यात कल्याण पश्चिममध्ये १२८, कल्याण पूर्वमध्ये ७२, बदलापूर मध्ये ११०, उल्हासनगर ७४, अंबरनाथ ६२ स्टँड असल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती रिक्षा चालक मालक असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष नवले यांनी दिली.


