Views: 484
कल्याण : भारतातील राष्ट्रीय पातळीवरील प्रथम कामगार संघटना ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ठाणे जिल्हा अधिवेशन ठाणे जिल्ह्या आयटकचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली दत्ता देशमुख सभागृह कल्याण येथे आयोजित करण्यात आले होते. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत, राज्य आयटक सरचिटणीस कॉम्रेड श्याम काळे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर, राज्य आयटक उपाध्यक्ष काँ.उदय चौधरी, नाशिक जिल्हा आयटक अध्यक्ष कॉ. व्ही. डी. धनवटे, वर्कर्स फेडरेशनचे उपसरचिटणीस अरुण मस्के, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव कॉम्रेड आत्माराम विशे, निवारा बांधकाम कामगार संघटना कॉ. रमेश जाधव, कामगार नेते अरविंद तापोळे उपस्थित होते.
अधिवेशनाची सुरुवात कॉम्रेड ए.बी. बर्धन व कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आली. अधिवेशना मध्ये विविध क्षेत्रातील दिवंगताना दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाचे प्रास्ताविक करताना ठाणे रायगड जिल्हा सचिव कॉम्रेड जी.आर. पाटील यांनी तीन वर्षाचा संघटनात्मक अहवाल, विविध आंदोलनात केलेली भागीदारी, विविध संघटनांना आयटकशी संलग्न केल्याबद्दल विस्तृतपणे माहिती दिली.
अधिवेशनामध्ये रंजिता गोलाबतीनी बिडी कामगार नेत्या, निर्मला पवार मोलकरर्णी कामगार नेत्या, निवारा बांधकाम कामगार नेते कॉम्रेड रमेश जाधव यांनी त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणी बाबत व आयटक संघटना वाढविण्याकरीता करण्यात येत असलेल्या प्रयत्नाबाबत आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयटकचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष लिलेश्वर बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम्रेड मंजू वर्मा यांनी केले. ठाणे जिल्हा नवीन कार्यकारणी सहा महिन्याकरीता असाही निवडण्यात आली. सहा महिन्यानंतर परत एकदा आयटकला संलग्न सर्व संघटनांचे अॅफिलेशन करून घेतल्यानंतर विस्तार कार्यकारणी जाहीर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला असल्याची माहिती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ठाणे जिल्हा सचिव काँ. जनार्दन पाटील यांनी दिली.



