Views: 159शिवसेना ५२ तर भाजपाचे ५१ नगरसेवक विजयी
कल्याण : बहुप्रतीक्षेत असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक पार पडून निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे वर्चस्व राहिले असून शिसेनेचे ५२ तर भाजपाचे ५१ नगरसेवक विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११, मनसेचे ५, कॉंग्रेसचे २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचा १ नगरसेवक निवडून आले आहेत. तर आता सत्तेच्या सारीपाटात महापौर पदासाठी शिवसेना भाजपा महायुतीचा महापौर बसविणार कि शिवसेना भाजपा उबाठा, मनसे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेऊन अंबरनाथ प्रमाणे सत्ता स्थापन करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.



