Views: 518
कल्याण : राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शनिवारी शाई फेक केल्याची घटना घडली. याच्या निषेधार्थ कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजप तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, अर्जुन भोईर, संजय कारभारी, शत्रुघ्न भोईर, निखिल चव्हाण, मितेश पेणकर, सौरभ गणात्रा, ज्योती भोईर, वैशाली पाटील यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. महाराष्ट्रात वैचारिक लढाई सुरु असते. नेहमी भाजपाला आरोपिच्या पिंजाऱ्यात उभे केले जाते. आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अत्यंत खालच्या स्तराळजावून आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. त्याचा जाहीर निशेध् करण्यासाठी भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.
शिंदे फडणवीस यांचा विकास सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा काम करत होती तेव्हा आणेल त्या विकास प्रकल्पना स्थगिती देण्यात आली होती. आज स्थगिती उठवून विकास काम सुरु आहे, हे विरोधकांना बघवत् नाही म्हणून् कुठला ना कुठला विषय घेऊन भाजपाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कल्याण पश्चिमचे माजज आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केला.



