Views: 557
शिवसेनेच्या वतीने भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन, १ ते ८ डिसेंबर पर्यंत हरिजागर, भजन, कीर्तन
कल्याण : दत्त जयंती उत्सवानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कल्याणमध्ये अखंड हरीनाम साप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण आणि भागवत कथा सोहळा होणार आहे. महिलांचा सन्मान करणारा असा हा भव्यदिव्य अखंड हरीनाम सप्ताह आहे. १ ते ८ डिसेंबर दरम्यान होणारा हरिजागर, भजन, कीर्तन सप्ताह संपूर्ण महिला वर्गाला समर्पित केला आहे. यामध्ये कीर्तनकार, भागवताचार्य, टाळकरी, मृदुंग, हरिपाठ, काकडी भजन यासर्व जवाबदार्या महिलाच पार पाडणार आहेत.
स्वसंकृतीचा जाज्वल्य अभिमान वाढवणारा आणि लहान मुलांच्या मनावर हिंदू संकृतीचा ठसा उमटविण्यासाठी हा उत्सव आहे. हा सप्ताह संपूर्ण महिलांना समर्पित केला आहे. यामध्ये कीर्तनकार, भागवताचार्य, टाळकरी, मृदुंग, हरिपाठ, काकडी भजन यासर्व जवाबदार्या महिलाच पार पाडणार आहेत. १ ते ८ डिसेंबर या काळात दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत भागवत कथेवर अरुणा साळवी यांचे निरुपण होणार आहे. याशिवाय मीरा ढाकणे, मुक्ता कुसाळकर, वनिता जात, पल्लवी घोगरे, कविता साठे, कांचन जगताप, सुप्रिया साठे ठाकूर, यांचे कीर्तन होणार आहे.
दररोज महिलांचे काकड्याचे भजन, ज्ञानेश्वर पारायण, भजन, भागवत कथा, सामुदायिक हरिपाठ, कीर्तन, हरिजागर होईल. दत्तमंदिर, परफेक्ट ड्रायविंग स्कूलच्या मागील मैदानात, मुरबाड रोड, रामबाग कल्याण पश्चिम याठिकाणी हा सोहळा होणार आहे. तर राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देऊन महिलांचा सन्मान केला होता. त्यामुळे महिला राष्ट्रपती आहेत याचा अभिमान व्यक्त करण्यासाठी दत्त जयंती उत्सवानिमित्त शिवसेना रामबाग विभागीय शाखेच्या वतीने अखंड हरीनाम सप्ताह आयोजित केल्याचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांनी सांगितले.



