पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा भाजपचा आरोप… मानपाडा पोलीस ठाण्यात भाजपचा मोर्चा…

Views: 947
शेअर करा:

कल्याण : डोंबिवली पूर्व भाजप मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत भाजप मनसेच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांचा निषेध केला. खोटा गुन्हा रद्द करन्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याचे मागणी देखील यावेळी करण्यात आली.

शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोप करत महिलेने भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पोलीस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करत या विरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेतला होता. मोर्चा दरम्यान मानपाडा पोलीसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यां विरोधात खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यानी केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता. यावेळी भाजपच्या शिष्टमंडळाने एसीपी सुनील कुऱ्हाडे यांची भेट निवेदन दिले.

याबाबत बोलताना जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी हा खोटा गुन्हा आहे हा गुन्हा रद्द व्हावाच मात्र तसेच मानपाडा पोलीस अधिकाऱ्याकडून भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जी वागणूक मिळते त्यात सुधारणा व्हावे अशी मागणी केल्याचे सांगितले. तर एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी जो गुन्हा दाखल आहे त्याबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आम्हाला निवेदन दिले आहे. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडून सुरू असून या गुन्ह्यातील सत्यता पडताळून पुढील कारवाई करण्यात येईल असा आश्वासन आम्ही भाजप शिष्टमंडळाला दिल्याचे सांगितले.  

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत