कारागृहातील बंदिंना वाचता येणार सर्वजनिक वाचनालयातील पुस्तके

Views: 456
शेअर करा:

कल्याण : शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणारे सार्वजनिक वाचनालयाने अनेक उपक्रम राबविण्याचे योजिले आहे. शालेय विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या बौद्धिक विकास होण्याकरिता १०० विद्यार्थ्यांना मोफत बालवाचन सेवा पुरविण्यात आली त्याबरोबरच कारागृहातील बंदींचा आत्मिक विकासा होण्यासाठी मोफत वाचनसेवा पुरवण्याचा अनोखा उपक्रम राजश्री शाहू महाराजांच्या जयंती निमित्त राबविण्यात आला.

एक लाखांपेक्षा जास्त ग्रंथसंपदा असणारे सार्वजनिक वाचनालयच्यावतीने बंदिंच्या पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शक म्हणून अनेक पुस्तके जसे कथा, कादंबरी, चरित्र व दिवाळी अंकपुरविण्यात आले असून त्यांच्या मागणीनुरूप दर पंधरा दिवसांनी पुस्तके पुरविण्यात येणार आहेत. जिल्हा कारागृहाचे अधीक्षक आर. आर. भोसले यांनी वाचनालयाच्या या विधायक कार्यास मोलाचा हातभार लावला. त्यांचे वाचन प्रेम, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची नावे तसेच अर्थतज्ञ व कुलगुरू, लेखक नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकातील प्रसंग त्यांनी बंदिंसोबत व्यक्त केले.

१६० वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच असा अनोखा उपक्रम सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या मार्गदर्शनाने चालविला जाणार आहे. व्यक्तीत अंतर्गत व बाह्यरूप बदलण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये आहे. त्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंदिंना समाजाकडून नाकारल्यानंतर एक माणूस म्हणून घडविण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे मत वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी मांडले. यावेळी वाचनालयाच्या चिटणीस आशा जोशी, खजिनदार दिलीप कर्डेकर, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी आणि वाचनालयाच्या ग्रंथसेविका उपस्थित होत्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत